Breaking News

मनपात शिवसेना नेहमीच नंबर 1 - महापौर कदम

अहमदनगर, दि. 24 - नगरमधील जनता ही शिवसेनेच्या पाठीमागे नेहमीच भक्कमपणे उभी राहिली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकदा एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. काम पूर्ण करण्यापेक्षा काम केल्याचा आव आणण्यार्‍यांची संख्या शहरात कमी नाही. इतरांसारखे शिवसेना नगरकरांना कधीही वेठीस धरत नाही व झुलवतही ठेवत नाही. जनतेने नेहमीच शिवसेनेची पाठराखण केली आहे. कारण त्यांना याची जाणीव आहे की, त्यांचे प्रश्‍न आतापर्यंत शिवसेनेनेच सोडविले आहेत व यापुढील काळातही सोडवतील. महापालिकेत शिवसेना नेहमीच 1 नंबरचा पक्ष ठरला आहे, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
प्रभाग 13मधील भुतकरवाडी, महेश कॉलनीत बंद पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक अनिल बोरुडे, नगरसेविका सारिका भुतकर, हनुमंत भुतकर, प्रा. विश्‍वनाथ जाधव, सुधाकर पडोळ, शंकरराव भुतकर, देवेंद्र देशमुख, शिवाजी लवांडे, अशोक सोहनी, वैभव शिंदे, साईनाथ गव्हाणे, सुरेश भुसा, अशोक सब्बन, लक्ष्मण बारसे, पोपट राऊत, विकी राऊत, वैभव बारसे, डॉ. संदीप चोपडे, मुकुंद तडका, संकेत राऊत, महेंद्र तडका, मनीषा शिंदे, शोभा शिंदे, ऋतुजा बारसे, लक्ष्मी तडका, यदुनाथ जोशी, सागर मुळे, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.