Breaking News

बसवेश्‍वरांच्या पुतळा कामाची केली आ. अमित देशमुख यांनी पाहणी

लातूर (प्रतिनिधी), दि. 03 -  लातूर महानगरपालिकेच्या वतीने बसवेश्‍वर महाविद्यालय परिसरात महात्मा बसवेश्‍वर यांचा सिंहसानाधिष्ठीत पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या उभारण्यात येणाऐर्या पुतळा परिसरात सुरु असलेल्या बांधकामाची माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. आमदार अमित देशमुख यांनी यावेळी सुरु असलेल्या कामाची  पाहणी करुन योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या. पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्यास सांगितले. यावेळी बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, माजी गटनेते नरेंद्र
अग्रवाल, नगरसेवक समद पटेल, दिनेश गिल्डा, व्यंकटेश पुरी, लातूर विधानसभा शहराध्यक्ष महेश काळे, सिद्रामप्पा पोपडे, नगरसेवक किशोर राजुरे, दिगांबर आळंदकर, उमाकांत कोरे, सुपर्ण जगताप, चंद्रकांत उरकुंडे, कुमार पारशेट्टी, सुनिल तिवारी, मारुती चव्हाण, प्रभुराज दिंडे, कंत्राटदार देशपांडे आदी उपस्थित होते.