Breaking News

मुक्तांगणने वार्षिक स्नेह संमेलनातून साकारला भारतीय सणांचा आविष्कार

लातूर (प्रतिनिधी), दि. 03 -  लातूरच्या विशालनगर भागातील श्री साई मंदिरासमोरील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये आठवे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून सादर केलेल्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीत अस्तित्वात असणार्या विविध सणांचे आविष्कार सादर केले होते.
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मुक्तांगण इंग्लिश स्कूलने दयानंद कॉलेजमधील सभागृहात आठव्या ऍन्युअल फेस्टीव्हलचे अतिशय थाटात आयोजन केले होते. यामध्ये कोहिजन ऑफ एन्टरटेनमेंट इंडियन फेस्टिव्हलस या आठव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीरचे प्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभास संबोधित करताना त्यांना पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्यावे, तेच आपले व देशाचे भविष्य आहेत असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण श्रीकांत तांदळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, पालकांनी मुलांना सोशियल मिडीच्या वापरापासून रोखले पाहिजे. त्याचप्रमाणे माहिती व ज्ञान यातील फरक त्यांनी सांगितला. मुलांना संस्कार देण्याचे काम आई, वडिल व शिक्षक यांनी करावे असे आवाहन प्रमुख पाहुणे डॉ. ओमशिवा लिगाडे यांनी केले.शाळेचे विद्यार्थी अर्णव कुलकर्णीख तिथी चौहान, मधुरा बाशिंगे, तेजस्विनी डिगोळे, श्रेया वांगस्कर, सर्वेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे पालक डॉ. प्रा. बालाजी व श्रीमती करमले शुभांगी यांनी आपले मत व्यक्त केले.
 शाळेतील विद्यार्थ्यांनी कोहीजन ऑफ एन्टरटेनमेंट इंडियन फेस्टिव्हलस हा सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रथम गुढीपाडव्याचा सण, या गिताने सुरुवात केली. दिवाळी, होळी, ख्रिसमस, शिवजयंती, गणेश फेस्टीव्हल, गुरूपुरग, बुध्दपौर्णिमा, ईद, दहिहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, वटसावित्री पूजा, नागपंचमी, बैल पोळा, रक्षाबंधन, महाशिवरात्री, नवरात्र, मकरसंक्रांत, राम नवमी, सणांच्या विविध गितांचे सादरीकरण करुन भारतातील सांस्कृती वैविध्याचे दर्शन घडविले. यामध्ये विविध जाती, धर्माचे लोक एकत्रित राहून संस्कृती व सांस्कृतीक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करतात हे यामधून दाखवून दिले. या प्रसंगी ‘स्कूल चले हम’ या नाटिकेचे सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैलजा पुरोहित यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना कवडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराधा माळी, माधुरी वाघमारे, कल्पना कवडे, रुपाली नरकडे, बंडू नकाते, संगिता डावारे, कमल मुंडे यांनी परिश्रम घेतले.