खरेदीदार-विक्रेता संमेलनात 5 कोटी 81 लाखांचा प्राथमिक सामंजस्य करार
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत प्रयोगशील शेतकरी बचत गट व स्थापित शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी (विक्रेता) शेती करुन उत्पादनात वाढ करत आहे. मात्र, त्यांच्या उत्पादीत मालाला योग्य दर मिळत नसल्याचे पाहूण महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शेतमाल व खरेदीदार यांच्या अंदाजे 5 कोटी 81 लाख रुपयांचे प्राथमिक 30 सामांजस्य करार झाले आहेत.
हॉटेल लेक व्ह्यू येथील सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनास आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिरोळकर, पुणे येथील शेतकरी सुविधा केंद्राचे समन्वयक कमलाकर पाटील, प्रकल्प उपसंचालक प्रकाश सूर्यवंशी, कोल्हापूरचे उपसंचालक (सामेती) एस. के. ठाकूर, कृषी पणन तज्ञ सायली महाडीक यावेळी उपस्थित होते.
या समेलनात प्रथम संजीवनी फुडसचे अभय पवार यांनी पृथ्वीराज लाड (डिस्कळ, ता. खटाव) यांच्याशी आवळा कॅन्डी, आवळा लोणचे, आवळा जाम याबाबत माहिती घेवून प्राथमिक सामंजस्य करार केला. के. बी. एक्सपोर्ट अशोक यादव यांनी हणमंत कुचेकर यांच्या सेंद्रीय कडीपत्त्याची 7 टन परिमाण उपलब्धता, वाण, डिस डब्ल्यु यांची माहिती घेवून सामंजस्य करार केले. कुचेकर यांनी वीजेशिवाय चालणार्या सोलर डिहायड्रेशन मशीनद्वारे भाजीपाला सुकवून त्याची उपयुक्तता व व्यवहार्यता करीता पावडर रुपात पॅकींग करुन विक्री केली जाते, असे यावेळी सांगितले.
वरधाविष्णु एंटरप्रायझेस, पुणे यांनी अशोक शेवते, कुडाळ, ता. जावली यांच्याशी अंतिम प्राथमिक सामंजस्य करार करुन त्यांच्या शेतमालाचे दर्जेदार उत्पादन आंबे हळद, हळकुंड, हळद पावडर, वाण-आंबे व सेलम बाबत माहिती दिली. या संमेलनात 5 कोटी 81 लाख इतक्या रकमेचे प्राथमिक सामंजस्य करार झाले. या अभिनव संमेलनात सांगली, जळगाव, वाशी, मुंबई, नाशिक, पुणे तसेच जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, खंडाळा या ठिकाणांहून 28 खरेदीदार आले होते.