Breaking News

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी 2 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर

खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश...

बुलडाणा, दि. 20 - सातपुडा पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील भागात विकासात्मक बदलासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतुद व्हावी, अशी मागणी खा.प्रतापराव जाधव यांनी आदिवासी विकासमंत्री ना. विष्णू सावरा यांच्याकडे 24 नोव्हेंबर 2016 रोजी पत्र जा.क्र. व्ही.आय.पी. 402 / 2016 यानुसार केली होती. याचा पाठपुरावासुध्दा खा. प्रतापराव जाधव यांनी सातत्याने केला असुन या मागणीला यश आले आहे. मुंबई येथे सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ता मजबुतीकरणासह पुल बांधकामासाठी 2 कोटी 65 लाख रुपयांची भरीव तरतुद झाली आहे. आदिवासी बहुल भागाच्या विकासाकरीता 5054 हेड अंतर्गत मार्ग व पुल यावरील खर्च या शिर्षाखाली जामोद ते कुवरदेव रस्ता मजबुतीकरण (15 लाख), गारपेट ते रायपूर रस्ता मजबुतीकरण (15 लाख), उसरा ते चालठाणा रस्ता (15 लाख), जामोद ते सोनबर्डी रस्ता (15 लाख), आदर्शग्राम योजनेअंतर्गत खा. जाधव यांनी दत्तक घेतलेल्या करमोडा ते शिवणी रस्ता मजबुतीकरण (15 लाख), आलेवाडी जोडरस्ता मजबुतीकरण (10 लाख) तसेच जिल्ह्यातील दयाल नगर ते वसाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (1 कोटी) आणि या मार्गावरील पुल (80 लाख) असा एकुण 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी खा. प्रताराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुर झाला आहे. या निधीमुळे आदिवासी भागातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.