Breaking News

रस्ते विकासासाठी 13.50 कोटींचा निधी

बुलडाणा, दि. 20 -  आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे लोणार तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 13 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मेहकर मतदारसंघातील  गावांना जोडणारे रस्त्यांची झालेली दुर्दशा बघता रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याची मागणी संबंधित गावांमधील नागरिक सातत्याने आ. संजय रायमूलकर यांच्याकडे करीत होते. जनतेच्या मागणीची दखल घेऊन आ. रायमूलकर यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना अंदाजपत्रकासह प्रस्ताव पाठविण्याचे सुचविले होते. त्यानुसार आ. रायमूलकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. 
यामध्ये सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव रस्त्यासाठी 2 कोटी 99 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. उंद्री-तोरणवाडा-धोत्रा-वडाळी-मांडवासाठी 2 कोटी 95 लाख, टेंभुरखेड-घाटबोरी-अंजनी रस्त्यासाठी 2 कोटी 99 लाख, मेहकर-मोळा-रत्नापूर रस्त्यासाठी 50 लाख, भोसा-दुर्गबोरीसाठी 50 लाख, माळेगाव-जोगदरी 50 लाख, मेहकर-सोनाटी रस्त्यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. रायमूलकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाअंती 13 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.