Breaking News

तीन तोळ्याचे दागिने घेवून महिलांनी केला पोबारा

लातूर, दि. 17 - येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या टाटा गोल्ड प्लस शोरूममध्ये दोन महिलांनी आम्हाला दागिने खरेदी करावयाची आहेत. याचा बहाना करून या शोरूममधील 30 ग्रॅम 600 मिली वजनाचे दागिने घेवून पोबारा केला.  लातूर येथील जुन्या नगर परिषदेच्या जागेवर असलेल्या टाटा गोल्ड प्लस शोरूममध्ये 7 मार्च रोजी दोन महिला आल्या होत्या. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. यावेळी त्यांना 30 ग्रॅम 600 मिली वजनाचे गंठन दाखविण्यात आले होते. हे गंठन त्यांनी मोठ्या शिताफीने पळविले. या प्रकरणी 15 मार्च रोजी लातूरच्या शिवाजी नगर पोलिसांत 84 हजार 54 रूपयांचा ऐवज चोरी झाल्याची तक्रार या शोरूमचे व्यवस्थापक अभिजीत मंचकराव चव्हाण यांनी दिली असून दोन अज्ञात महिलांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.