Breaking News

वनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप

दुबई, दि. 11 - वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीनं जाहिर केलेल्या या क्रमावारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसर्‍या तर विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेली 5 वनडेची सीरिज दक्षिण आफ्रिकेनं 3-2नं जिंकली. या सीरिजमध्ये एबीनं 262 रन केल्या. वेलिंग्टनमध्ये झालेल्या शेवटच्या वनडेमध्ये 85 रनची खेळी केल्यामुळे एबीला पहिल्या क्रमांकावर झेप घेता आली.
आयसीसीच्या या क्रमवारीत टॉप 10मध्ये फक्त कोहली हाच एकमेव भारतीय आहे. या क्रमवारीमध्ये रोहित शर्मा 12, धोनी 13व्या आणि शिखर धवन 15व्या क्रमांकावर आहेत. बॉलरच्या यादीमध्ये भारताचा अक्सर पटेल 11व्या क्रमांकावर आहे. वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थान गाठण्याची एबीची ही दहावी वेळ आहे. पहिल्यांदा मे 2010मध्ये एबी पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. 2009नंतर एकदाही एबी डिव्हिलियर्स पहिल्या पाच बॅट्समनमध्ये कायम आहे.