Breaking News

कमाईत सिंधुने धोनीलाही टाकले मागे

नवी दिल्ली, दि. 11 - जाहीरातींमधून मिळणार्‍या उत्पन्नाच्याबाबतीत पी.व्ही. सिंधु धोनीच्याही पुढे गेली आहे.  मीडिया रिपोर्टनुसार पी. व्ही. सिंधुच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्मने सांगितलं की, ’तिची जाहीरातींची दररोजची फी 1 ते 1.25 करोड रुपये आहे.’ तर विराटची फी दिवसाला 2 करोड आहे. याचाच अर्थ आता तिच्यापुढे फक्त विराट कोहली आहे.
या यादीत धोनीनंतर सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा येते. रिओ ऑलंपिकमध्ये सिल्वर मेडल मिळवुन सिंधुने देशाला गौरव मिळवुन दिला. या विजयानंतर तिची किंमत 15 ते 20 लाखाने वाढली.  गेल्या काही महिन्यात तिने जवळपास 30 ते 35 करोडांचे करार केले आहेत. ती वेगवेगळ्या मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करते.