हास्य कविसंमेलन उत्साहात संपन्न बहुजन साहित्य संघाच्या वतीने आयोजित...
बुलडाणा, दि. 17 - होळी निमित्त दिलखुलास प्रतिभेचे हुरहुन्नरी रंग काव्य रूपाने उधळण्यासाठी बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने हास्य कविसंमेलन आयोजन दि. 12 मार्च रोजी फुले-आंबेडकर वाटिकेत करण्यात आले होते. या कविसंमेलनाला रसिकांनी, कविंनी तथा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याबाबत सविस्तर असे की, बहुजन साहित्य संघ, चिखली गेल्या काही महिन्यांपासून साहित्यक्षेत्रातील नवोदित तसेच तरूण कवी, लेखक, साहित्यिकांकरिता एक मंच उभे करून देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खास होळीनिमित्त चिखली शहरात ‘हास्य कविसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटोले साहेब व प्रमुख उपस्थितीमध्ये आनंदराव हिवाळे उपस्थित होते. यावेळी महापुरूषांच्या पूजनानंतर नैसर्गिक रंगाची होळी सर्वांनी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच फुले-आंबेडकर वाटिकेतील सर्व केरकचरा जमा करून त्याची वाटिकेच्या बाहेर होळी करण्यात आली.
यावेळी अॅड.विजयकुमार कस्तुरे यांनी ‘अशी भांडू नको, कण्या कांडू नको’ या कवितेसोबतच ‘ईव्हाई बापु असं काय करता, चला जोडीनं म्हसणात जाऊ’ अशा कविता सादर करून उपस्थितांमध्ये एकच रंग भरला. त्यानंतर मनोहर पवार यांनी ‘नोटबंदी लाए है मोदी’ तर पिसे सरांनी ‘होळीची हाळी’, अॅड.गिरीष दुबे यांनी ‘हमभी कभी शेर थे, शादीसे पहले’, सत्य कुटे यांनी ‘गुमसुम गंगा घाट है’, तर मिलिंद कांबळे यांनी ‘व्हानावं घरात’, सुनिल कासारे यांंनी ‘मनोगत’, निवृत्ती जाधव यांनी ‘हातणी-मालगणी, तुम्ही दोन बहिणी’, प्रा.शालिनी काटोले यांनी ‘करा होळी द्वेषाची’, सुरेश बोंद्रे यांनी ‘राजकारण म्हणजे सापशिडी’ तर महेश वाधवाणी यांनी ‘भंग के तरंग में’, मधुकर काळे यांनी ‘आज माह्या राजाले, माही दया आली’, कवी नंदी यांनी ‘रंगभरी पिचकारी’, शंकर गवई यांनी ‘आण तुह्या वडलाकडून गॅस फुकट’ तर प्रदीप बांबल यांनी ‘होळीचं पुजन’ अशा समर्पक आणि सरस हास्य कविता सादर केल्या.
या बहारदार कविसंमेलनाचे सूत्रसंचालन महेश वाधवाणी यांनी तर आभारप्रदर्शन कवी मनोहर पवार यांनी केले. या कविसंमेलनाकरिता बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती लाभली. संमेलनाकरिता बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष अॅड.विजयकुमार कस्तुरे, सचिव मनोहर पवार, उपाध्यक्ष किसन पिसे यांनी अथक परिश्रम घेतले.