Breaking News

प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

जळगाव, दि. 30 - जळगावमध्ये प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांकडून मेहरुण परिसरातील ममता रुग्णालयाची तोडफोड केली. इतकंच नाही तर चारचाकी गाड्यांच्या काचा आणि रुग्णालयाच्या रिसेप्शनचीही मोडतोड करण्यात आली. यामुळे रुग्णालयाचं मोठं नुकसान झालं आहे.
ममता रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी या महिलेला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी रुग्णालयाची मोडतोड केली. दरम्यान, डॉक्टारांवरील होणारे हल्ले याविरोधात मागील काही दिवस राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर होते. रुग्णालयात सुरक्षा रक्षक आणि इतर सोयी देण्याचं सरकारनं दिलेल्या आश्‍वासनानंतर डॉक्टरांनी हा संप मागे घेतला होता.