Breaking News

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला

अहमदनगर, दि. 30 - आदर्श शिंदे, बेला शेंडे, जूईली जोगळेकर, जयंत पानसरे यांनी गायिलेली भन्नाट गाणी, शर्वरी जमेनिस, तेजा देवकर, यांची दिलखेचल  नृत्य अदाकारी, समिर चौगुले, भक्ती रत्नपारखी यांची खुसखुशीत कॉमेडी, पूर्वा पिंपळीकर, निलेश औटी यांची सॅण्ड आर्ट व  पेंटीग्ज अशा विविध रंगी  सादरीकरणाने रसिक गु्रप परिवाराच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त जाँगिंग पार्क मैदानावर आयोजित ‘रसिकोत्सव’ हा नव्या जून्या, मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम  चांगलाच रंगला. या कार्यक्रमास उदंड प्रतिसादाने अक्षरश: डोक्यावर घेतले.
कार्यक्रमाच्या मध्यांतरात पालकमंत्री प्रा. राम शिंदे, नरेंद्र फिरोदिया, प्रदिप गांधी, डॉ.सुजय विखे,ृ सुभाष कायगावकर, संदिप तांबोळी, पेमराज बोथरा, सचिन  जाधव, सुनिल मुनोत, प्रसन्न मुथा, रमेश फिरोदिया, सुरेश चव्हाण, बाळासाहेब विश्‍वासराव, संतोष झावरे, निहार भरणे, डॉ.प्रकाश कंकारिया, हेमंत देशमुख,  भालचंद्र शिरोडे,  एस.पी.कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, बाळासाहेब विश्‍वासराव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रसिकोत्सवाचे’ उद्घाटन झाले. मान्यवरांच्या  हस्ते जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘रसिक गौरव’ तर रणजीपटू अनुपम संकलेचा यांना ‘तरुणाई पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.