Breaking News

बुलडाणा शहर हगणदारी मुक्त करणेसाठी नगर परिषदेचे आणखी एक पाऊल

बुलडाणा, दि. 22 - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील प्रत्येक घरामध्ये शैचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्यासाठीचा प्रयत्न आरोग्य विभाग नगर परिषद बुलडाणाच्या माध्यमातुन होत आहे. शहरातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या मदतीने व व्यापक जानाजाग्रानाच्या माध्यमातुन शहरामध्ये शौचालय बांधणीच्या कामाला वेग आला आहे. शहर 100% हागणदारी मुक्त होण्याच्या हस्ठीने नगर परिषद बुलडाणा मार्फत गुड मोर्निंग पथकाची नियुक्ती केली असुन उघड्यावर शौच्या वर बसणार्‍या व्यक्तींना गांधी गिरीच्या माध्यमातुन शौचालय बांधण्यासाठी प्रववृत करण्यात येत आहे.
बाजार परिसरामध्ये महिला व पुरूषांची मोठ्या प्रमाणात ये जा असते परंतु या परिसरात सार्वजनिक शौच्यालायाची व्यवस्था नसल्याने महिला व पुरूषांची कुचंबना होत असल्याने नगर परिषद बुलडाणाच्या च्या वतीने वैशिष्ट्यपुर्ण निधी अंतर्गत परदेसी पुरा, भीम नगर, इक्बाल चौक, आठवडी बाजार च्या नागरिकांसाठी तसेच बाजाराच्या दिवशी येणार्‍या नागरिकांसाठी नगर परिषदेकडुन स्त्री व पुरूषांसाठी स्वतंत्र असे सामोहिक शौचालय बांधण्यात आले आहे. या सार्वजनीक शौच्यालयाचे उद्घाटन उपाधाक्ष विजय जायभाये व आरोग्य सभापती उमेश कापुरे यांच्या हस्ते व मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना बेंडवाल, याकुब शेठ, बबलु कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 21 मार्च 2017 रोजी उद्घाटन करण्यात आले. या सार्वजनिक शौच्यालयामुळे बुलडाणा शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नगर परिषदेचे अजुन एक पाउल पुढे पडले आहेत्र.
तरी परदेसी पुरा, भीम नगर, इक्बाल चौक, आठवडी बाजार, परिसरातील सर्व नागरिकांनी उघड्यावर शौच्यालायला न जाता या सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा असे आवाहन या वेळी मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला उप मुख्यधिकारी देशपांडे अभियंता राहुल मापारी, निलेश इंगळे, सतिश पुदाके, गजानन बदरखे, सतीश पडघान, महेंद्र सोभागे हे उपस्थित होते.