Breaking News

इव्हीएमची विश्‍वासार्हता!

दि. 02, मार्च - राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये पुन्हा एकदा इव्हीएम मशीनच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले. राज्यात भाजपाचे कमळ फुलले, मात्र राज्यातील अनेकांचा अंदाज होता की भाजपाला नोटाबंदी, अच्छे दिन न आल्यामुळे, सर्वसामान्यांची नाराजी मतदानाच्या यंत्राद्वारे लोकांचा राग प्रगट होईल अशी अपेक्षा असतांना, भाजपाने मारलेली मुसंडीवर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले ते इव्हीएम मशीनवर. तसेच अनेक अपक्ष उमेदवारांना जर कुणी मतदान केले नाही, तर ते स्वता: अथवा कुटुंबातील सदस्य तरी त्यांना मतदान करतात. असे असतांना त्यांना मते शुन्य मिळाली. मग स्वता: केलेले मतदान गेले कुठे, हे प्रश्‍नचिन्ह अतिशय गंभीर आहे. वास्तविक हा एका जिल्हयातील प्रकार नसून, राज्यात अनेक जिल्हयात हा प्रकार बघायला मिळाला हवा. यांची दखल निवडणूक आयोगाने घेऊन, मतदारांसह, इतरांनी केलेल्या प्रश्‍नांवर निवडणूक आयोगाने समिती नेमून याचा धांडेाळा घेण्याची गरज आहे. लोकांच्या मनातील प्रश्‍न दूर करून निकोप निवडणूका पार पाडणे, याचबरोबर आपण केलेले मतदान योग्य उमेदवारालाच गेले पाहिजे, हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे इव्हीएम मशीनवर निर्माण केलेल्या प्रश्‍नचिन्हा चा सखोल अभ्यास करून, जर खरंच अस काही घडले, असेल, इव्हीएम मशीन मॅनेज करण्याचा प्रकार घडला असेल, त्यावर कठोर पावले उचलण्याची धमक निवडणूक आयोगाने दाखवण्याची गरज आहे. तसेच जर या शंकामध्ये दम नसेल, तर त्याचेही शंका निरसन आयोगाने केले पाहिजे. इव्हीएम मशीनवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणे म्हणजे देशातील लोकशाहीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. कारण असे सिध्द झाल्यास इव्हीएम मशीन मॅनेज करून लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा हा प्रकार गंभीर म्हटला पाहिजे. एकूण झालेले मतदान आणि मतमोजणी या दोन्हीमध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे इव्हीएममधील शंका दूर करण्यासाठी, व काही घोळ झाला असेल तरीही निवडणूक आयोगाने पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात इव्हीएममशीची अत्यंयात्रा काढली जाते, पंरतू निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्टेटमन काढले जात नाही. त्यामुळे याविषयीचा घोळ अजूनही वाढत आहे. तसेच यामध्ये अजून काही सुधारंणा करता येईल का? याविषयी देखील चाचपणी घेण्याची गरज आहे. मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची पोचपावती मिळण्याची आवश्यकता आहे. जर असे झाले, तर खरे कोण ? खोटे कोण, याची पृष्टी होण्यास मदतच मिळेल. अर्थात ईव्हीएम मशीन मॅनेज करणे तसे शक्य नाही. कारण ईव्हीएम मशीन एका मतदान केंद्रावर कितीतरी असतात. तसेच ते र्ज्या कंपनीकडून पुरविले जातात, त्या कंपनीकडून अतिशय गुप्तता बाळगण्यात येते. कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या केंद्रावर जाणार याची माहिती कोणत्याच अधिकार्‍यांला नसते. शिवाय इथे एक मशीन मॅनेज करायची नाही. एकाच केंद्रावर मोठया संख्येने इव्हीएम मशीन असतात. एका जिल्हयात मतदान घ्यायचे म्हटल्यावर हजारो ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करणे शक्य आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोणत्याही आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.