Breaking News

मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार

मुंबई, दि. 02 - मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार आहे. 8 मार्च रोजी दुपारी 12 महापौरांची निवड केली जाईल. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापौर निवडणूक तारखेत बदल करण्यात आला. 4 मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 8 मार्चला म्हणजे महापौरपदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली. आधी 9 मार्चला महापौर निवडणार असल्याचे बोलले जात असतानाच अचानक आयुक्तांच्या आदेशानंतर 8 मार्च ही तारीख महापौर निवडीसाठी ठरवण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या जुने नगरसेवक पदावर असले, तरी चिटणीस विभागाकडून जुन्या नगरसेवकांना सभागृह बैठकीसाठीचे निमंत्रणच पाठवले जाणार नाही. केवळ 2017 मध्ये निवडून आलेल्या नव्या सदस्यांनाच निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.