Breaking News

तिसर्‍या दिवस अखेर भारत 6 बाद 360

पुजाराची शतकी खेळी

रांची, दि. 19 - ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यातील तिस-या दिवसअखेर भारताने 6 बाद 360 अशी भक्कम धावसंख्या उभारली. चेतेश्‍वर पुजाराच्या शतकी खेळीमुळे भारताला साडेतीनशेपार मजल मारणे शक्य झाले. आता भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 91 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी, आज 1 बाद 120 या धावसंख्येवरून चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली विजय यांनी खेळाला सुरूवात केली. या दोघांनीही पहिल्या सत्रात चिवट खेळी केली. 73 धावांच्या भागीदारीनंतर मुरली विजय 82 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहली (6), अजिंक्य रहाणे (14), करूण नायर (23) आणि अश्‍विनही (3) झटपट बाद झाले. अखेर वृद्धिमान साहाने चेतेश्‍वर पुजाराला चांगली साथ देत दिवस संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि धावसंख्या साडेतीनशेपार नेली. पुजाराने कारकिर्दीतील 11 शतक झळकावले. दिवसअखेर पुजारा 130 तर साहा 18 धावांवर खेळत आहे. कमिन्सने 4 तर हेजलवूड आणि ओकॅफेने 1-1 गडी बाद केला.