Breaking News

सागर अजागे ठरला ‘आय टी आयडॉल - 2017’

। स्मार्ट फोन, 1टीबी क्षमतेची हार्ड डिस्क व पॉवर बँक देऊन विजेत्यांचा गौरव

अहमदनगर, दि. 11 - ’सीड इन्फोटेक’ तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने  आयोजित करण्यात आलेल्या’सीड आयटी आयडॉल - 2017’ या बहुप्रतिक्षीत स्पर्धेतील अहमदनगर विभाग विजेत्यांची नावे नुकतीचमाऊली संकुल यासभागृहामध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. देशपांडे,डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख दीपक विधाते यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी’सीड इन्फोटेक’च्या कार्यकारी संचालिका भारती बर्हाटे, ’सीड इन्फोटेक’ चेअहमदनगर विभागप्रमुखश्रीकांत सावंत आणि प्राची पवार हे देखील उपस्थित होते.’सीड इन्फोटेक’नेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमधील संगणकीय ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आयएमएससीडीआर महाविद्यालयातीलसागर अजागेया विद्यार्थ्याने प्रथम पुरस्कार पटकाविला. त्यालास्मार्ट फोन देऊन गौरविण्यात आले. शासकीय तंत्रविद्यालयातीलश्रेया वाशीकरहिलासलग दुसर्यांदा द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिला1टीबी क्षमतेची हार्ड डिस्कदेऊन सन्मानित करण्यात आले तर छत्रपतीशिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राजक्ताकर्डिलेहीतृतीय क्रमांकाचीविजेती ठरली व तिला पॉवर बँक प्रदान करण्यात आली.विभागीय पातळीवर विजयी ठरलेल्या या सर्व सीड आयडॉल विजेत्यांना आता पुण्यात होणार्या ’सीड महा आयटी आयडॉल 2017’ मध्ये सहभागी होता येणार आहे. ही अंतिम स्पर्धामार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये आयोजित केली जाणार आहे. ’सीड महा आयटी आयडॉल 2017’ मधील विजेत्याला लॅपटॉप देऊन गौरविण्यात येणार आहे.