चारपेक्षा जास्त बँक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क!
मुंबई, दि. 02 - कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खासगी बँकांनी बँक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 4 पेक्षा जास्त वेळा होणार्या बँक व्यवहारांवर प्रत्येकी 150 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. 1 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार पैसे काढणे आणि पैसे बँकेत भरणे (थेट बँकेतून किंवा एटीएममधून) अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहाराचा समावेश आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवीन नियम लागू होणार आहेत. हा नियम 1 मार्चपासून सेव्हिंग आणि सॅलरी अकाउंटवर लागू करण्यात आला आहे.
एचडीएफसीनं जारी केलेल्या एका पत्रकानुसार, पहिले चार व्यवहार मोफत असतील. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क असून त्याशिवाय टॅक्स आणि सेसही वसूल केला जाणार आहे. त्याशिवाय थर्ड पार्टी कॅश व्यवहारवर 25,500 रुपयांपर्यंतची सीमा निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ: समजा, तुम्हाला शंभर रुपये काढायचे असतील तरी तुम्हाला त्याव्यतिरिक्त 150 रुपयांपेक्षा (कर आणि सेससह) जास्त रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. एचडीएफसीच्या होम ब्रँचमधून दर दिवशी दोन लाखांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील, त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील. मात्र किमान 150 रुपये आकारले जाणार असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच 2 लाख 1 हजार रुपये काढले किंवा भरले तरी दीडशे रुपये चार्ज केले जातील. नॉन होम ब्रँचमधून दर दिवशी 25 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील. त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील.
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, महिन्यातील पहिले चार व्यवहार मोफत असणार आहेत. त्यानंतरच्या व्यवहारावरील प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपये अतिरिक्त शुल्क असणार आहे. तर थर्ड पार्टी कॅश व्यवहारवर 50,000 रुपयांपर्यंतची सीमा निश्चित करण्यात आली आहे. तसेच बँकेत पैसे जमा करण्यावरही प्रति हजार पाच रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. कॅश मशीनमधून फक्त एकाच वेळेस मोफत रक्कम जमा करता येणार आहे. त्यानंतर येथील व्यवहारावर देखील प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपये शुल्क असणार आहे.
अॅक्सिस बँकेनं पहिले पाच व्यवहारावर किंवा 10 लाख रुपयांपर्यंत बँकेत पैसे जमा करण्यावर कोणतंही शुल्क आकारलेलं नाही. मात्र, पाचव्या व्यवहारानंतर प्रत्येकी 1000 रुपयावर 5 रुपये किंवा 150 रुपये (जे अधिक असतील) शुल्क आकारलं जाईल. एकीकडे खासगी बँकांनी हा नियम लागू केला आहे. पण सरकारी बँकांनी हा नियम लागू केलेला आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.