Breaking News

गरीब रुग्णांवर मोफत उपचाराची 100 टक्के अंमलबजावणी करा; धर्मादाय आयुक्तांना सूचना

पुणे, दि. 22 - राज्यात धर्मादाय अंतर्गत 450 रुग्णालये असून, त्यामध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र, गरिबांसाठी मोफत उपचाराची सुविधा असलेल्या या रुग्णालयांतील कोटा गरिबांसाठी वापरण्यातच येत नसल्याचे वास्तव होते. त्याची धर्मादायरुग्णालयाच्या उच्चाधिकार तपासणी समितीने दखल घेऊन आता गरिबांचा निधी उपयोगात आणण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
राज्यातील धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी विशेष खाटा राखून ठेवलेल्या असतात. मात्र, गरिबांना या हक्कापासून वंचित ठेवले जात होते. 2015पासून उच्चाधिकार समितीने गरिबांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून रुग्णालयांवर वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. या समितीमार्फत 100 टक्केअंमलबजावणीचा आग्रह धरण्यात येऊ लागला. याचा परिणाम म्हणून 2015 मध्ये गरीब रुग्णांवर 180 कोटी रुपयांचे उपचार करण्यात आलेआहेत. 2016 मध्ये या रुग्णालयात 200 कोटी रुपयांपर्यंतचे उपचार गरिबांवर करण्यात आले.
50 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांवर (निर्धन) या रुग्णालयांत 100 टक्के मोफत उपचार करण्यात येतो. 50 हजारांपेक्षा जास्त आणि 1लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना उपचारात 50 टक्के सवलत दिली जाते. या योजनेअंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 72 लहानबालकांवर मोफत हृद्यविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विविध भागात घेण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातूनहीहजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. वोक्हार्ट रुगणालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 300 बालकांच्याहृदय विकाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही ठिकाणी आरोग्य महामेळाव्याच्या माध्यमातूनही उपचार करण्यात आले. ‘मिशन आशा- दकिरण’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 20 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.