। गौरीची कामगिरी मोलाची । गौरीचा सत्कार संपन्न
अहमदनगर, दि. 27 - नगर गौरीसारख्याच्या माध्यमातून प्रथमच नगरला हा मान मिळाला आहे.मुर्ती लहान पण किती महान याप्रमाणेच गौरीने केलेला कामगिरी आहे.सातारासमुद्रापार प्रभाग,शाळेचे व देशाचे नाव नेण्याचे काम तिने केले आहे गौरीने केलेली कामगिरी फक्त नगर शहरापुती मर्यादित नसुन त्यांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षराने व्हावी असे प्रतिपादन नगरसेविका कलावती शेळके यांनी केले. प्रियदर्शनी पब्लिक स्कूल व ज्युनिअर काँलेजची विद्याथीनी गौरी मनोहर गागरे हिने पुणे येथे झालेल्या राष्टीय थायबाँक्सिंग स्पर्धेत महाराष्ट राज्याला सुवर्णपदक मिळवल्याबददल तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी शेळके बोलत होत्या. पप्पू शेळके, काका शेळके,अमोल बगाडे, अनिल मगर, सोनू ढोणे, सागर गायकवाड वैभव जठार ,मोहसीन शेख,सुरज जावळे, अँड.महेश देवणे, सारीका शेळके, शेखर ढुमणे न्यू आर्ट्स चे प्राध्यापक चंद्रकांत वाव्हळ व गणेश उत्सव मंडळाचे कायकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कलावती शेळके पुढे म्हणाल्या की,प्रत्येकाने एक तरी खेळ खेळावा.खेळाच्या माध्यमातून एकमेऐकांना मदत करण्याची वत्ती वाढीस लागते.आरोग्य चांगले राहते शरीर मन सुदढ होण्यास मदत होते. सुत्रसंचालन पप्पू शेळके यांनी केले. आभार सारीका शेळके यांनी मानले.क्रिडाशिक्षक घनश्याम सानप,अमोल काजळे, यांचे गौरीला मागदर्शन लाभले गौरीला मागदर्शन लाभले.