Breaking News

आजच्या तरुणांनी शिवचरित्राचे वाचन करावे - भोस

अहमदनगर, दि. 26 - मिरजगांव येथील श्री. संत गजानन  महाराज  ग्रामिण विकास प्रतिष्ठाण संचलित सदगुरू कृषी महाविदयालय व शिवषंकर कृषी अभियांत्रिकी महाविदयालय मिरजगांव यांच्या संयुक्त विदयमानाने शिवजयंती  निमित्त षिवचरीत्र व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिव-शंभु चरीत्रकार सुनंदाताई भोस बोलतांना म्हणाल्या आजच्या तरूणामध्ये इतिहास  वाचनाचा  मोठा अभाव असुन तरूणांनी खरा इतिहासाचा शोध घेणाचा प्रयत्न करावा. फक्त आपण महापुरूषांच्या जयंत्या साजर्‍या करण्यातच धन्यता मानतो परंतु हया महापुरूषांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे विचाराची व ज्ञानाची शिदोरी कमी पडते. तसेच आजच्या तरूणांना छत्रपती शिवाजी  महाराजांच्या प्राचिन खरा इतिहास समजावुन घेवुन त्यांचे विचार अंगिकारने गरजेचे आहे. फक्त त्यांच्या सारखा पेहराव करून विचार धारन होत नाहीत. त्यासाठी शिवचरीत्राचे वाचन आवष्यक आहे . यावेळी  संस्थेचे संस्थापक शंकरषेठ नेवसे, अध्यक्ष उध्दवषेठ नेवसे, राजेद्र गोरे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह इंगळे, प्राचार्य रामदास  बिटे, प्रा. गणेष करनावर, प्रा. महेष निकम, प्रा राम कापरे,प्रा.टकले,प्रा.विरकर  सह सर्व प्राध्यापक वर्ग व महाविदयालयीन सर्व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी सदगुरू कृषी विदयालयातील विदयार्थ्यांनी शिव जयंती निमित्त येथिल आश्रम शाळेतील मुलांना खावु वाटपाचा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम कृषी 2013 च्या विदयार्थ्याच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कापरे यांनी केले प्रस्ताविक प्रा.करनावर यांना केले तर आभार डॉ. इंगळे यांनी मानले.