दिल्लीमधील मराठी पत्रकार संघटनेचे कार्य कौतुकास्पद
अहमदनगर, दि. 26 - ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी लढणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य संपुर्ण राज्याला परिचित असले तरी, देशाची राजधानी दिल्ली येथेही मराठी पत्रकारांसाठी या संघ्ज्ञटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत दिल्लीतील महाराष्ट्र राज्य परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे विमोचन प्रसंगी कांबळे बोलत होते. यावेळी माहिती सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, वरीष्ट सहायक कमलेश पाटील, वरीष्ट लघुलेखाधिकारी सी.टी. रामचंद्र, संसदभवन नवी दिल्लीचे संयुक्त सचिव एस. बी. शिंदे, अधिकारी अंजु निसारकर, उपसंपादक रितेश भुयार, रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे, मराठा सेवा संघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष कमलेश पाटील यांसह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आपल्या कार्याची पावती महाराष्ट्रात नव्हे तर देशाची राजधानी दिल्ली येथेही मराठी पत्रकारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांचा नक्कीच आम्हाला आदर वाटतो. महाराष्ट्राचे नाव आजही दिल्ली दरबारी मराठी पत्रकार आपल्या सडेतोड व निर्भीड पत्रकारीतेने जनतेसमोर मांडत असताना राज्य मराठी पत्रकार संघाची कौतुकाची थाप पत्रकारांना आपली मातृभुमी वाटते. दोन ते तीन वर्षापासून या दिनदर्शिकेचे दिल्ली येथे राज्यातील वास्तव्य करणार्या नागरिकांना देखील या दिनदर्शिकेमुळे नक्कीच फायदा झाला आहे. राज्य मराठी पत्रकार संघाचे दिल्ली येथे पत्रकार व जनतेसाठी सुरु केलेले अभियान नक्कीच कौतुकास्पद असून याचा आम्हाला अभिमान वाटतो.
राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामीण भागातील पत्रकारांनी केले असून त्यांच्या सोबतीला मराठी पत्रकार संघ उभा राहिला आहे.
यावेळी दिल्ली येथे मराठी व राजकीय नेत्यांनी दिनदर्शिका प्रदान करण्यात आली.