Breaking News

कामगारांच्या मुलांच्या हातात लेखणी देवून मार्कंडेय शाळेने क्रांती घडवली

अहमदनगर, दि. 26 - विडी कामगार व हातमाग कामगारांच्या मुलांच्या हातात लेखणी देवून मार्कंडेय शाळेने क्रांती घडवली. जीवनामध्ये जे रडतात त्यांचा पराभव होतो, तर जे लढतात ते जिंकतात. विद्यार्थ्यांनी गरिबीशी व वाईटप्रवृत्तीशी लढण्याचे आवाहन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय माध्य. व उच्च माध्य. विद्यालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त पगडाल बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद क्यादर, उपाध्यक्ष रमेश सब्बन, सचिव विलास पेद्राम, डॉ.रत्ना बल्लाळ, बाळकृष्ण सिद्दम, अरविंद चन्ना, बाळकृष्ण गोटीपामूल, शाळेच्या प्रथम शिक्षिका शालिनी गोसकी, मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे, उपमुख्यध्यापक पांडुरंग गोने, प्राथ. मुख्यध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, संजय गंभीरे, पर्यवेक्षक दिपक रामदिन, सरोजनी रच्चा, विठ्ठलराव मंगलारम, अनिल आचार्य, संभाजी जगदाळे, मीना परदेशी, शिक्षकेतर प्रतिनिधी विष्णू रंगा, संदिप छिंदम, प्रमोद चन्ना, मोहन दोमल आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
  पुढे बोलताना पगडाल म्हणाले की, शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मागे वळून पाहताना अनेक क्षेत्रात माजी विद्यार्थ्यांनी नांवलौकिक मिळवल्याचे दिसत आहे. दृष्टी असेल तर चांगली सृष्टी निर्माण करता येते. उच्च ध्येयाची दृष्टी ठेवून, विचाराच्या श्रीमंतीने यशस्वी होण्याचा कानमंत्र त्यांनी दिला.  कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मा सुरकुटला व रेखा बुरा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे म्हणाले की, शाळेतील सर्वसामान्य कामगारांची मुले आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. या शाळेतील दोन शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळण्याचा बहुमान मिळाला आहे. शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याचे सांगत, त्यांनी शाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर केला. विलास पेद्राम यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख मांडला. पाहुण्यांचा परिचय सचिन गावडे यांनी करुन दिला. विद्यार्थी व शिक्षकांनी साकारलेल्या हस्तलिखीत भरारी चिमुकल्या पंखाची व पद्मसृष्टी या ग्रंथाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.