नगर स्टेशनला वाय-फाय सुविधा देण्याची मागणी
अहमदनगर, दि. 26 - रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर दिनेश शर्मा यांनी नगर रेल्वे स्टेशनला भेट देवून पहाणी केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना नगर स्टेशन येथे वाय-फाय सुविधा द्यावी, पार्सल गाड्यां थांबविण्यासाठी वेळ वाढवावी, पुणे-लखनोर, पुणे-गोरखपुर गाडी नगरला थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करताना समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा समवेत खा.दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप, सोलापुर विभागीय मॅनेजर ठुबे, स्टेशन मास्तर ए.यू.पाटील, आर.के. गांधी, अशोक कानडे, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, विपुल शहा आदि उपस्थित होते.