Breaking News

नगरमध्ये अवतार मेहेर बाबाचा जन्मोस्तव उत्साहात संपन्न

अहमदनगर, दि. 26 - मधील सरोष पेट्रोलपंपा शेजारील मेहेरबाबा नगरकेंद्रा मध्ये अवतार मेहेरबाबाच्या 123 वा जन्मोस्तव कार्यक्रमात आज वाढदिवस  मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहाटे 6 वा अवतार मेहेरबाबा कि जय म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
          नगरसह  देश विदेशातील भाविक यावेळी उपस्थित होते विविध भाविकांनी गीते सादर केली तर मेहेरनाथ कलचुरी यांनी बाबाच्या कार्या विषयी, त्याचा आध्यत्मिक 5 गुरु विषयी व बाबाना  पाहून साईबाबानी  पर्वददिगार का म्हटले याची माहिती दिली . मेहेराबादच्या पंपकीन हाऊस  च्या विध्यार्थ्यानी गीते म्हटली  नंतर  आरती प्रार्थाना करण्यात आली व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली मेहेरबाद टेकडी (अरणगाव )येथील बाबाच्या समाधी  ठिकाणी हि जन्मोत्सव संपन्न झाला ,त्याठिकाणीही मोठ्या संखने भाविक उपस्थित होते , नगर मध्ये  दि 24 फेबु पासून जन्मोस्तव कार्यक्रम सुरु झाले असुन ते 27 फेबु पर्यंत चालणार आहे . नगर मधील सरोष पेट्रोल पंपा शेजारील मेहेरबाबा नगर केंद्रा मध्ये दररोज रात्री जन्मोस्तव कार्यक्रमात विविध कार्यक्रम होत असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मेहेरनाथ कलचुरी , दीपक थाडे , मधुकर डाडर याच्या सह सेन्टरच्या सदस्यांनी केले आहे .