तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यानंतर मंगळवारी पुन्हा बँका बंद?
नवी दिल्ली, दि. 27 - महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसाच्या सलग सुट्ट्यांनतर आज सर्वच बँकांचे व्यवहार सुरु होत आहेत. पण नऊ बँक युनियननी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे मंगळवारी पुन्हा बँका बंद राहण्याची शक्यता आहे.
देशातील नऊ बँकेच्या श्रमिक संघटनेची प्रतिनिधी संस्था असलेल्या, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)ने सरकारच्या लोकविरोधी बँक सुधारणांच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. तसेच नोटाबंदीनंतर बँक कर्मचार्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाबद्दल योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी यूएफबीयूनं 28 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय संपाचं आवाहन केलंय. या संपात सरकारी बँका सहभागी होणार असून, खासगी बँकांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. या संपामध्ये एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यासह इतर बँका सहभागी होणार असल्याने, त्यांनी आपल्या ग्राहकांना याची सुचना दिली आहे.