मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 27 - मराठीला तिचे वैभव, प्रतिष्ठा आणि हक्क प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असून तिची जोपासना आणि संवर्धन करण्यासह भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तिला सक्षम करणेही गरजेचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, मराठी भाषेचे भवितव्य सुरक्षित आणि समृध्द करण्यासाठी मराठीच्या विविध बोलींची जोपासना व्हावी. जागतिकरणाचा संदर्भ हा मुलत: आर्थिक असल्याने मराठी भाषा आाणि साहित्य व्यवहाराशी अर्थकारण जोडले जावे. जगभरातील नवनवे ज्ञान-तंत्रज्ञान तिच्यात समाविष्ट व्हावे. संगणकीय महाजालावर तिचा वापर वाढण्यासह नव्या युगाचा मूलमंत्र ठरलेल्या डिजिटल माध्यमातून तिचा साहित्य व्यवहार विस्तारला जावा. अनुवादाच्या मदतीने साहित्य आणि ज्ञान या दोन्ही अंगाने तिच्या कक्षा विस्ताराव्या अशा विविध पध्दतीने ती नव्या युगाशी जोडली जाईल आणि खर्या अर्थाने तिला जागतिक भाषा म्हणून गौरव प्राप्त होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.