ज्योती कदम यांना शिवांजली युवा साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
ज्योती कदम यांची मोरपीस आणि गारगोट्या,चित्रकाव्य आदि चार पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले आहे तसेच व्याख्याने दिली आहेत. नामवंत व नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकावरील त्यांचे समीक्षण आदि लेखन अनेक दैनिकांमधून प्रकाशीत झाले आहे. त्यांच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला असून विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केले आहे. यापूर्वी त्यांना दै. लोकमत सखी सन्मान पुरस्कार, कुसुमताई चव्हाण महिला भूषण विशेष सन्मान पुरस्कार, पंढरी युवा गौरव साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. सदरील शिवांजली युवा साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आज 27 रोजी मराठी भाषा दिनी शिवांजली शैक्षणिक संकुल चाळकवाडी, जुन्नर पुणे येथे संपन्न होत आहे. ज्योती कदम यांना सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.