भाजपाचे यश निर्मळ, निर्भेळ नाहीच.!
दि. 01, मार्च - गेल्या काही दिवसापासून केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षावर लोकशाहीची मोडतोड केल्याचा आरोप होतोय.सत्तेचा अवाजवी दुरूपयोग करून व्यवस्थेला बटीक बनविल्याचा संशय व्यक्त केला जातोय.का होतोय हा संशय व्यक्त?
अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपाला अनपेक्षित मिळालेले घवघवीत यश हाच खरा कळीचा मुद्दा ठरला.सरकारच्या कारभाराला मिळालेली पावती असे या यशाचे वर्णन सत्ताधार्यांकडून केले जात असले तरी शिवसेनेसह झाडून सार्या विरोधकांना हा युक्तीवाद अमान्य आहे.गेल्या दोन वर्षातील या सरकारचा कारभार या यशाला पुरक नव्हता.जिवनाश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले तर शेतीमालाचे घसरलेले भाव,विविध प्रकारच्या करप्रणालीमुळे नाराज असलेले उद्योजक व्यवसायीक,नोकरदार,शेतकर्यांना कर्जमाफी,नोटाबंदीच्या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामिण भागात निर्माण झालेला असंतोष या गौष्टी सरकारचे प्रगती पुस्तक लालशेरा मारल्यासारखे आहे.अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत होत्या. सरकारसाठी एकूणच निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणात मराठा आणि बहूजन क्रांती मोर्चाची भर पडली होती.याच आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपाला मोठा धक्का बसेल अशी अटकळ बांधली जात होती.तथापी निकाल लागल्यानंतर धक्का भाजपाला बसण्या ऐवजी त्या अटकळीलाच बसला.देवेंद्रांच्या भाषेत भाजपा क्रमांक एकचा पक्ष बनला.
हे यश भाजपाने निखळ लोकशाहीने प्राप्त केले यावर माञ राजकीय विरोधकांसह जनतेचाही विश्वास बसत नाही.व्यवास्थेला वापरून सत्ताधार्यांनी हे यश आपल्या पदरात पाडून घेतले असा आरोप उघडपणे केला जातोय.ईलेक्ट्रानिक वोटींग मशीन मनेज केले इथपासून तर निवडणूक आयोगाची यंञणा व तत्सम प्रशासन यंञणा आपल्या बाजूने वापरून घेण्या पर्यंत हे आरोप आहेत.विशेष म्हणजे हे आरोप केवळ विरोधकांकडूनच होतात असे नाही तर, पक्षांतर्गत गटबाजीचे बळी ठरून पराभूत झालेल्या काही भाजपाच्या उमेदवारांच्या तोंडूनही तत्सम आरोप ऐकायला मिळतात तेंव्हा या आरोपांचे गांभिर्य दखलपाञ ठरते.
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांपैकी इव्हीएम मशिन मनेज केल्याचा हास्यास्पद ठरविला जातोय.अनेकांच्या मते हे यंञ मनेज करता येत नाही.त्याचे प्रात्याक्षिक पाहूनही ही मंडळी वास्तव मान्य करीत नाहीत.अंधविश्वासाने आंधळे झालेले काही भक्त तर त्याही पुढे जाऊन भाजपातील काही बलाढ्य मंडळींच्या आप्त स्वकीयांचा झालेला पराभव उदाहरण म्हणून सांगतात.खरे तर उदाहरणासाठी जे मान्यवर पराभव सांगीतले जातात त्यांचे निवडून येणे पक्ष सत्ताधिशांच्या एकानुवर्ती अधिकाराला घातक ठरणारे आहे म्हणून त्यांचा पराभव घडवून आणला गेला असावा ही शक्यता माञ ते विसरतात.आणि महत्वाचे म्हणजे सर्रास सर्वदूर मशीन मनेज करणे राजकीय आत्महत्येला निमंञण आहे ही साधी बाब न समजण्या इतका भाजपाचा थिंक टँक मुर्ख नक्कीच नाही.सोयीच्या ठिकाणी ही मनेज प्रणाली वापरली गेली असावी अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.
हा झाला एक भाग.या आरोपाविषयी स्पष्टच बोलायचे झाले तर तो सिध्द करणे सहज सोपे नाही.वेळेचा अपव्यय करणारे आहे.अन्य आरोप माञ रास्ता आहे.जे सर्व सत्ताधारी करतात तेच भाजपानेही केले.निवडणूक आयोगाची यंञणा,राज्य जिल्हा प्रशासन,पोलीस यंञणा महसूल प्रशासन या सार्या यंञणेला सत्तेचा धाक दाखवून वापरून घेतले.सुरूवात प्रभाग रचनेपासून झाली.पुर्वीच्या दोन सदस्यीय प्रभागाऐवजी चार सदस्यांचा प्रभाग करून प्रभागक्षेञ विस्तारीत करण्यामागे सत्ताधार्यांचा हेतू शुध्द नव्हताच. विधानसभेचा जवळपास अर्धा मतदार संघ म्हणता येईल एव्हढ्या मोठ्या मतदार संघात सामान्य उमेदवार किंवा छोटे पक्ष निवडणूक लढवू शकत नाहीत हे माहीत होते.म्हणजे सामान्य घटक इथेच निवडणूक प्रक्रियेतून बाद ठरविला गेला.त्यानंतर वेळ आली मतदार याद्या तयार करून खुल्या करण्याची.तेही त्यांच्या पध्दतीने झाले.प्रत्यक्षात मतदानाचा दिवस उजाडला तेंव्हा त्यांनी मतदार याद्यांमध्ये केलेला घोळ लक्षात आला.अनेकांना मतदानाच्या हक्कापासून जाणीवपुर्वक वंचित ठेवले गेले.
हे सारं आपल्या पध्दतीने पध्दतशीरपणे घडवून आणले जात असतांना आचारसंहीता काळात पुन्हा सत्तेच्या जोरावर यंञणेला हस्तक बनवून कार्यभार उरकून घेतला पैसा आणि सत्ता दोहोंचाही यथेच्छ वापर करीत लोकशाहीची घोर विटंबना करून मिळविलेले हे यश निर्मळ,निर्भेळ म्हणता येणार नाही.हे एव्हाना जनमानसात मान्यता पावले आहे.आता प्रश्न एव्हढाच आहे की त्यावर मात कशी करायची? (क्रमशः)