ग्रामदैवतश्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ दर्शनासाठी भाविक भक्तांची भल्या पहाटेपासूनच गर्दी

शुक्रवार ,दि. 24 फेब्रुवारी ते 12 मार्च 2017 असे एकूण 17 दिवस हा यात्रा महोत्सव चालणार आहे. गुरुवारी , 23 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता सलामीच्या तोफांची आतषबाजी व गवळी समाजाच्या महाभिषेकानंतर दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटे 5 वाजता संत सावता माळी भजनी मंडळातर्फे सावता माळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. तत्पश्चात सिद्धेश्वर मंदिरात सकाळी 8 वाजता पुष्प अभिषेक व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी 9 वाजता उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते श्रींची महापूजा व 101 ब्रम्हवृंदांच्या सस्वर वेदमंत्रोच्चाराच्या घोषात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देवालयाच्या व यात्रा महोत्सव समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय वारकड , महेश हिप्परगे , श्रावण उगले , देवालय व यात्रा महोत्सव समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे, सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक , ज्ञानोबा कलमे , व्यंकटेश हालिंगे , सुरेश गोजमगुंडे, बच्चेसाहेब देशमुख, प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री सिद्धेश्वर रत्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री - पुरुष भाविक भक्तानी भल्या पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये , यासाठी यात्रा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी , स्वयंसेवक व पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पाहावयास मिळाले. मागील दोन - तीन वर्ष अवर्षणजन्य परिस्थितीत गेल्यानंतर यावर्षी वरूण राजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे यात्रा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणांत साजरा होणार याची कल्पना आल्याने यात्रा महोत्सव समितीने यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कोणतीही कसर राहणार नाही , याची पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विक्रम गोजमगुंडे यांनी दिली. यात्रा महोत्सवादरम्यान भाविक भक्तांना शिस्तीत दर्शनाचा लाभ घेता यावा तसेच यात्रा महोत्सवाचा आनंद लुटता यावा यादृष्टीने यात्रा समितीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नरत आहेत.
यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवादरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवाचा लातूर व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे , मुख्य संयोजक ज्ञानोबा कलमे , संयोजक व्यंकटेश हालिंगे, देवालयाचे सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक , कोषाध्यक्ष रमेश बिसेन , सुरेश गोजमगुंडे , बच्चेसाहेब देशमुख, ओम ज्ञानोबा गोपे , लातूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती व सहसंयोजक विक्रांत गोजमगुंडे, पप्पू कुलकर्णी , धनंजय बेंबडे , सुनील होनराव , प्रदीप पाटील खंडापूरकर, चंद्रकांत चिकटे , सुधीर धुत्तेकर, रविशंकर जाधव, चांदपाशा घावटी , राजा मणियार, गणेश गवारे, श्रीराम भुतडा, शैलेश स्वामी, दत्तात्रय लोखंडे, रमेश भुतडा, गोविंद पारीख , बाबुअप्पा सोलापूरे , उत्तमराव मोहिते, विठ्ठलराव गिते , एड. उदय गवारे , महादेवप्पा अंकलकोटे यांसह यात्रा महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.