महाबळेश्वरमध्ये वावटळामुळं पर्यटकांची तारांबळ
सातारा, दि. 26 - महाबळेश्वरमध्ये शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या वावटळाने सर्वांचीच दाणादाण उडाली. व्यापार्यांनी उभ्या केलेल्या छत्र्या वावटळामुळे उडून गेल्या. जगभरातील पर्यटकांच्या मनपसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरतील वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक नौकाविहार, घोडेसवारीचा आनंद घेत असतानच वेण्णा लेकच्या वाहनतळावरच अकस्मात वावटळ निर्माण झालं. यानंतर मैदानातले हे वावटळ सुमारे पाच मिनिटे घुमत होते.
या दरम्यान, रस्त्यालगत असणार्या छोट्या-मोठ्या स्ट्रॉल विक्रेत्यांच्या छत्र्या उडून गेल्या. तसेच अनेकांची तारांबळ उडाली. लहान मुले महिला धावत दूर गेल्या. तर काही पर्यटक कौतुकानं हे वावटळ गाड्यांमध्ये बसून पाहत होते. हे वावटळ पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व महाबळेश्वर बाजार पेठेकडे निघालेले पर्यटक थांबले. या चक्री वावटळाचं मोबाईलमधून शूटिंग काढण्यासाठीही जणू स्पर्धा लागली होती.