Breaking News

स्मिथचं शतक, ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी

पुणे, दि. 25 - कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या खणखणीत शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत भारतावर मोठी आघाडी घेतली आहे.  पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 105 धावांत गारद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 155 धावांची आघाडी मिळाली होती. ती वाढून कांगारुंनी ही आघाडी आता 400 च्या पुढे नेली आहे. ऑस्ट्रेलियाने आज 4 बाद 143 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रवींद्र जाडेजाने मिचल मार्शला (31) बाद करुन पाचवा, तर उमेश यादवने मॅथ्यू वेडला तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला.
मात्र दुसरीकडे कर्णधार स्टीव्ह स्मिथ खिंड लढवत होता. स्मिथने आधी रेन शॉ आणि मग मार्शच्या साथीने शतकाकडे वाटचाल केली.  स्मिथने 187 चेंडूत खणखणीत शतक झळकावलं. स्मिथचं हे कसोटीतील 18 वं तर भारताविरुद्धचं पाचवं शतक आहे. तर कर्णधारपदी विराजमान झाल्यापासून हे त्याचं दहावं शतक आहे.