राज्यभरात बारावीची परीक्षा, 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी
मुंबई, दि. 28 - राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे.
राज्यातील एकूण 9 हजार 143 ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी ही परीक्षा देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील 2 हजार 710 केंद्रांवर ही परीक्षा होईल. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथक नेमण्यात आलेत. तर कॉपी रोखण्यासाठी एकूण 252 पथकं सज्ज आहेत.