औरंगाबादमध्ये खंडणीसाठी 10 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
औरंगाबाद, दि. 28 - खंडणीसाठी 10 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. वर्धन धोडे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच वर्धनच्या वडिलांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
आरोपी अभिलाष महोनपूरकर आणि शाम मगरे यांना रात्री तीन वाजता केली अटक करण्यात आली आहे. काल रात्री औरंगाबादमधल्या गुरूकुंज हाऊसिंग सोसायटी, टिळकनगर भागातून साडे आठ वाजता वर्धन धोडे या 10 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या घरात पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही टाकण्यात आली होती. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मध्यरात्री 12 च्या सुमारास दोन्ही आरोपींनी वर्धनची गळा आणि तोंड दाबून निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून श्रेयनगर परिसरातील नाल्यात फेकला. आरोपी पळ काढत असताना त्यांची गाडी एका झाडाला अडकली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला.