राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी नगरसेवक धनवडे
अहमदनगर, दि. 22 - जामखेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगरसेवक बिभीषण शामराव धनवडे यांची निवड करण्यात आली.नुकतेच या निवडीचे पत्र माजी मंत्री सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक जिल्हा अध्यक्ष कपील पवार यांनी दिले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, माजी युवक तालुका अध्यक्ष अॅड.मयुर डोके पाटील, रमेश आजबे,प्रशांत राळेभात हे उपस्थित होते.नगरसेवक धनवडे यांनी मागील महिन्यात मिरजगाव येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरेश धस,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात मनसेतुन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.मयुर डोके यांनी वरीष्ठ स्तरावर काम करण्याची इच्छा माजी मंत्री सुरेश धस व जिल्हा अध्यक्ष कपील पवार यांच्या कडे व्यक्त केल्याने तालुका अध्यक्षपदाची धुरा अन्य कार्यकर्त्याकडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.त्यानुसार मनसेतुन राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेल्या नगरसेवक धनवडे यांना ही संधी देण्याचा निर्णय धस व पवार या नेत्यांनी घेतला त्या नुसार त्यांना नियुक्ती चे पत्र देण्यात आले.धनवडे यांच्या निवडीने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे