दे.मही येथे मूलीच्या जन्माचे स्वागत
‘बेटी बचाओ बेटी पढाव’ चा संदेश देत राऊत परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम
बुलडाणा, दि. 22 - एकीकडे स्त्री भृण हत्या होत असताना देऊळगाव महीतील राऊत कुटुंबियाला मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.हां आनंद मोठा गाजा-वाजा करत व बेटी बचाओबेटी पढाओ “मै बोझ नही हू पापा. आम्ही जन्म दिला तूम्ही पण द्या.. अश्या बोध वाक्याने सजलेले बँनर लावून जनजागृती करण्याचा चागला प्रयत्न राऊत परिवाराने केला.मूलिचे वडिल संदिप राऊत आई आश्वनि राऊत, आजोबा विजय राऊत यांच्या सह राऊत परिवाराने आपल्या एकुलत्या एक मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी थेट समस्थ मित्रपरिवार नातेवाईक सर्वांना जंगी भोजन ठेवून मूलिच्या नामकरणासाठी आमंत्रीत केले. मुलीच्या जन्माच अशा प्रकारच स्वागत सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार आहे.
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, मुलगी जन्मली तर ती ‘नकोशी’ अशा बुरसटलेल्या विचारांनी स्त्री-भ्रूणहत्यांच्या घटनां होत आसतानाच पालकत्वाची बदलती मानसिकता राऊत परिवाराच्या या मूलगी जन्माच्या स्वागतातून दिसत आहे.
यावेळी बोलतांना पालक संदिप राऊत यांनी सांगीतले की ईतर सर्व आई वडीलांनी मूलगी झाल्यास आनंद साजरा करावा व मूलगा मूलगी असे भेदो न करता समानतेची वागनूक द्यावी. सर्व क्षेत्रातून राऊत परिवाराचे कौतुक होत असून मूलिच्या जन्माचे स्वागत हे आदर्श निर्माण करणारी बाब आहे अशी चर्चा परिसरात आहेत.
