साईनगर परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेले रस्त्याचे काम सुरू
अहमदनगर, दि. 22 - नगर - प्रभाग 5 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा मिळत आहेत. साईनगर येथील नागरिकांना रस्त्याअभावी आतापर्यंत मोठा त्रास सहन करावा लागला. आता रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे त्रास दूर होणार असून, हे काम सुरू केल्याबद्दल नागरिकांनी श्री. वाकळे यांना धन्यवाद दिले आहेत.
प्रभाग 5 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून साईनगर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक स्वप्नील शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, अंकुश धाडगे, भैय्या पठाण, लियाकत सय्यद, सोन्याबापू रोमन, जीवन पवार, तुषार बंग, रघुनाथ दौंड, विनोद शिंदे, सुदाम भोसले, भीमाबाई घोरपडे, जयश्री देशमुख, रूपाली भोंडवे, मीना कामदे उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, विकासकामे झाल्याशिवाय नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच मोठी कामे तर करीत आहोत. मात्र, छोटी-छोटी कामे पूर्ण करून नागरिकांचा त्रास दूर करीत आहोत, असे सांगितले.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, साईनगर परिसर ही मोठी वसाहत आहे. येथे नागरिकांना नागरी सुविधा मिळतच आहे. मात्र, रस्त्याचे काम झाले नसल्याने हे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी होती. आता हे काम पूर्ण होणार असून, रस्त्याचे काम पूर्ण झाले की परिसराची शोभा वाढणार आहे. साईनगर परिसरात पूर्वी कुठलीच कामे झाली नव्हती. मागील 3 वर्षांत या भागात विविध कामे आपण केल्याचे ते म्हणाले.