Breaking News

कमांडो विनोद गायकवाड यांचा अपघाती मृत्यू

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील सुपने येथील लष्करी सेवेत कार्यरत असणारे विनोद अशोक गायकवाड (वय 28) यांचा दिल्ली येथे अपघाती  मृत्यू झाला. दिल्ली येथील आयएमटी मानेसर चौकात रविवारी दुपारी अपघात झाला. विनोद राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे कमांडो होते.
विनोद गायकवाड व एनएसजी पथकातील ओडिशाचा कमांडो सुदर्शन नायक कामानिमित्त मोटारसायकलवरून जाताना दिल्ली येथील आयएमटी मानेसर चौकात  पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात विनोद गायकवाड व सुदर्शन नायक या दोघांचाही मृत्यू झाला. सोमवारी  पश्‍चिम सुपने येथे नातेवाईकांना याची कल्पना देण्यात आली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली. मंगळवारी त्यांचे पार्थिव दिल्लीहून पुणे येथे व तेथून पश्‍चिम  सुपने येथे आणण्यात येणार आहे. या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विनोद गायकवाड 7 वर्षांपासून लष्करी सेवेत होते. दीड  वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. तेे पत्नी सायलीसह दिल्ली येथे राहत होते. 10 दिवसांपूर्वी विनोद लहान भावाच्या लग्नासाठी पश्‍चिम सुपने येथे आले होते.  यानंतर लगेचच ते दिल्लीला परतला होते. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.