Breaking News

पिंपळगांव काळे येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बुलडाणा, दि. 04 - पिंपळगांव काळे येथे बुध्दसंदेश नवयुवक मंडळ व क्रांतीसुर्य महात्मा फुले मंडळ पिंपळगांव काळे यांचे संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात पंचशिल व त्रिशरण घेवुन सुरवात झाली  गावच्या सरपंचा सौ.संगिताताई सोळंके यांनी सावित्रीबाई फुले  यांच्या प्रतीमा पुजनाने झाली. दोन्ही आयोजक मंडळांच्या सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले व गौतमबुध्द यांचे प्रतीमा पुजन केले. संतोष  गवई यांनी सावीत्रीबाई फुले यांनी केलेल कार्य व त्या कार्याने प्रेरीत होवुन स्त्रियांनी भविष्यातली वाटचाल कशी असावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  संचालन श्रिकृष्ण गवई यांनी तर आभार प्रदर्शन प्रसीक गवई यांनी केले.