Breaking News

शिवसेनेचे अनिल शिंदे काँग्रेसमध्ये

सांगली, दि. 17 - तासगांव तालुक्यातील सावळज येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल शिंदे यांनी रविवारी सेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. या पक्षप्रवेशासाठी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांनी पुढाकार घेतला होता.
माजी तालुकाप्रमुख अनिल शिंदे मागील 22 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत होते, मात्र शिवसेनेत निष्ठेला किंमत नसल्याची टीका करुन, सामान्य कार्यकर्त्यांना आता सेनेत न्याय दिला जात नाही. आताची सेना ही पैसेवाल्यांची झाल्याचा आरोप करुन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रमुख कार्यकर्त्यांसह आ. मोहनराव कदम आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात सांगली येथे प्रवेश केला.
यावेळी बोलतांना आमदार कदम म्हणाले, तासगाव तालुक्यातील जनतेला आता फक्त काँग्रेस व कदम घराण्याचीच आशा राहिली आहे. जिरवाजिरवित तालुक्याचा विकास खुंटला आहे. त्यात पूर्व भाग हा दुष्काळात भाजून निघाला आहे. त्याच्या विकासासाठी काँग्रेस दिवस - रात्र एक करेल.सुनील पाटील, गजानन पाटील, अनिल पाटील, सुनील मगदूम, श्रीकांत शिंदे, काकासाहेब शिंदे, गजानन शिंदे व अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.