भारतीय वंशाच्या अभिनेत्याला ऑस्करमध्ये पाच नामांकने
मुंबई, दि. 27 - भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ या चित्रपटासाठी ऑस्करमध्ये पाच नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासह आणि पाच श्रेणीत नामांकने मिळाली आहेत. देव पटेल याला या चित्रपटासाठी सह कलाकार श्रेणीत नामांकन मिळाले आहे. देव पटेल याच्याबरोबर सनी पवार, प्रियंका बोस, दीप्ति नवल आणि तनिष्ठा चॅटर्जी यांनी भूमिका साकारली आहे. देव पटेल याने यापुर्वी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटात भूमिका साकारली होती.
