Breaking News

सामाजिक न्याय विभागात प्रजासत्ताक दिन साजरा

नाशिक, दि. 27 - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नाशिक येथे दि.26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात  आला. नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकचे उपायुक्त राजेंद्र कलाल, संशोधन अधिकारी खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,  नाशिक प्राची वाजे, सहाय्यक संचालक (लेखा) हेमंत जाधवर, लेखाधिकारी योगेश आंबरे, समाज कल्याण अधिकारी के.जी.बागूल, विशेष अधिकारी देविदास  नांदगांवकर ,पोलीस निरीक्षक नंदलाल पाटील, जनसंपर्क अधिकारी सुरेश पाटील, शशिकांत पाटील, विधी अधिकारी संतोष सरकटे, आर.डी.देवरे, डी.व्ही.शिंदे,  एस.बी.त्रिभुवन, ए.पी.मोरे, राजू कांबळे, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शासकीय अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बलसागर भारत होवो !’, ‘वंदे मातरम् !’ आदी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी मागासवर्गीय गुणवंत मुलींच्या  शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थींनी, कर्मचारी व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.