‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेक राज्यांतून विरोध
मुंबई, दि. 27 - भारतीय जनता पक्षाशी संबंधीत संघटनांच्या समर्थकांकडून आज अनेक राज्यांमध्ये ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये प्रदर्शनाला विरोध करणा-या बजरंग दलाच्या समर्थकांना अटक करण्यात आली. तर जबलपुर येथे विरोध करण्यासाठी आलेल्या धार्मिक संघटनेच्या लोकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये काही जणांनी अभिनेता शाहरुख खानविरुद्ध घोषणा दिल्या. राजस्थानमध्येही ‘रईस’च्या प्रदर्शनासाठी विरोध करण्यात आला. मात्र येथे कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे समर्थकांचे विरोध प्रदर्शन यशस्वी झाले नाही.
