अखेर जलिकट्टूच्या अध्यादेशाला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : तामिळनाडूत चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाने जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रतिक्षा आहे.जलिकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी आता लाखो लोकांसोबत सेलिब्रिटींनीही आवाज उठवला आहे.
ख्यातनाम संगीतकार ए. आर.रहमान यांनी एक दिवसाचे उपोषण केले. रहमान यांच्यासोबत अभिनेते रजनीकांत, अभिनेते कमल हसन, विख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, आर अश्विन, आर्ट
ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांनी जलिकट्टूचे समर्थन केले आहे. बैलांना चिडवण्यासाठी त्यांना मद्य पाजून, मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात
नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.
