Breaking News

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या व्यापक जनजागृृतीसाठी ‘लाडली एक्सप्रेस’

बुलडाणा, दि. 04 -  बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ कार्यक्रमा अंतर्गत मुलीची संख्या जिल्हयात वाढविण्याकरीता व्यापक जनजागृतीसाठी  सावित्रीबाई फुले यांच्या  जयंती दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा व आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.विजय  झाडे यांचे  हस्ते आज दिनांक 03 जानेवारी 2017 रोजी लाडली एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ, या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात मुलीची संख्या वाढविण्याकरीता विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मुलीचे महत्व,  मुलीच्या शिक्षणाचे महत्व जनतेमध्ये पटवून देण्याकरीता शासनाकडुन मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. आज, क्रिडा, शिक्षण, राजकीय, शासकिय नौकर्‍या  हया सर्व क्षेत्रात मुली पुरुषांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या पंखांना अधिक बळ देण्यासाठी आणि मुलींची संख्या जिल्हयात वाढविण्याकरीता  व्यापक जनजागृती होण्याकरिता दिपा मुधोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्र परिवहन महामंडळ बुलडाणा व आरोग्य विभाग जिल्हा  परिषद बुलडाणा यांच्य सयुक्त विद्यमाने एस.टी बसवर बेटी बचाओ, बेटी पढाओ, हा संदेश देवून सावीत्रीबाई फुले यांच्या जयंती दिनांचे औचीत्य साध्ाुन दिनांक  आज 03 जानेवारी 2017 रोजी डॉ.विजय झाडे जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या  हस्ते लाडली एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. आज महाराष्ट्र परिवहन  महामंडळाच्या बसेस जिल्हयातील सर्व ग्रामीण भागापर्यंत हजारो प्रवाशांची ने-आण करतात. एसटी बसवर बेटी बचाओ, बेटी पढाओ, चा संदेश देऊन या  उपक्रमामुळे व्यापक जनजागृत्रती होऊन जनतेमध्य मोठया प्रमाणावर परिर्वतन होईल व ते मुलांकरीता गभर्र्लिंग निदान करणार नाही. तसेच ज्या कुटुंबामध्ये मुली  आहेत त्यांचे संगोपण चांगल्या रीतीने करुन त्यांना उच्च शिक्षीत करतील असे मनोगत डॉ.विजय झाडे जिल्हाधिकारी, यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमास मु.का.अ.जिल्हा परिषद दिपा मुधोळ, डॉ.शिवाजी पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्वश्री अनील मेहतर विभाग नियंत्रक बुलडाणा,  सुभाष पाटील विभागीय वाहतुक अधिकारी, रविद्र खेडेकर आगार व्यवस्थापक, दिपक साळवे स्थानक प्रमुख, दिपक वैद्य सहाय्यक वाहतुक नियंत्रक  महाराष्ट्र  परिवहन महामंडळ बुलडाणा तसेच डॉ.आर.डी. गोफणे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.प्रशांत बढे तालुका आरोग्य अधिकारी बुलडाणा, डॉ.इमरान खान  तालुका आरोग्य अधिकारी चिखली, डॉ.सैयद, वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंन्द्र चांडोळ, श्री आर.बी जाधव जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी,  राजेश लोखंडे,  तसेच आरोग्य विभाग व एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी व बसस्थानकातील अनेक प्रवासी मोठया प्रमाणावर हजर होते.