Breaking News

सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर जळगांव जामोद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन साजरा

बुलडाणा, दि. 04 - स्थानिक सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर येथे आज दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन शिक्षक व  विद्यार्थी यांचेकडुन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व शिक्षीकांनी प्रतीमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन केले. विद्यार्थी व  विद्यार्थीनिंनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे विचार मांडले. उंबरकर सर , गवई सर व बकाल मँडम यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  पालीवाल सर तर आभार प्रदर्शन सिमा इंगळे मँडम यांनी केले.