Breaking News

म्हातारपिंप्री सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी हिरडे तर उपाध्यक्ष ठोकळे यांची निवड

अहमदनगर, दि. 04 - श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्रि सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बापुसाहेब नामदेव हिरडे यांची तर उपाध्यक्षपदी रतन भिमाजी  ठोकळे यांची एकमताने निवड झाली असुन यावेळी निवडणूक निर्णय  अधिकारी म्हणून बी.के.शिवरकर यांनी काम पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव एम.पी.ईथापे  यांनी मदत केली. दि.1 जानेवारी रोजी सकाळी आकरा वाजता संस्थेच्या सभागृहात हि निवड प्रकिया पारपडली त्यावेळी अध्यक्ष पदासाठी हिरडे नावाची सुचना संचालक शहाजी हिरडे यांनी मांडली त्यास नवनाथ काळाणे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी ठोकळे यांच्या  नावाची सुचना खान शेरखान यांनी मांडली त्यास मारुती शिरसाठ यांनी अनुमोदन दिले निवडी नंतर मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात  आला त्यावेळी  यावेळी नुतन अध्यक्ष म्हणाले सर्व सभासदानी आमच्यावर विश्‍वास ठेवून संस्थेत काम करण्याची संधी दिली त्यास पात्र राहून भविष्यकाळात  सर्वाना बरोबर घेऊन गोरगरिब शेतकर्‍यांना न्याय देणार आसे म्हणाले .कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य संघटनेचे उपाध्यक्ष अरुणकाका हिरडे .खान  राजेखान.प्रकाश सस्ते.बाळासाहेब घोडके.हरिभाऊ गाडेकर. शहाजी ठोकळे.कांतीलाल हिरडे.जाफरभाई शेख.मोहन मांडे.कांतीलाल गाडेकर.संतोष  गोसावी.लताबाई पोकळे.शोभा गाडेकर.यांच्या सह मान्यवर हजर होते.शेवटी माजी अध्यक्ष नवनाथ काळाणे यांनी आभार मानले. निवडी नंतर माजी मंत्री बबनराव  पाचपुते साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते. मा.जि.प.अध्यक्ष भाजप तालुका अध्यक्ष बाळासाहेब माहाडिक.यांनी नुतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे  अभिनंदन केले आहे.