आज बुलडाण्यात पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्याचे होणार अनवरण
बुलडाणा, दि. 06 - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारीतेचे आद्यजनक त्यांच्या ‘मुव्हेबल’ पुतळ्याचे अनावरण पत्रकार दिनी म्हणजेच शुक्रवार 6 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या आवारात एका शानदार सोहळ्यातुन होणार आहे. हे अनावरण ‘चिंतन’ ग्रुप पुणेचे पत्रकार अभिनंदन थोरात यांच्याहस्ते व बुलडाणा अर्बन न्युजचे संपादक राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळ हा पुतळा पत्रकार भवनाला भेट देणारे दर्पण पुरस्कारप्राप्त जेष्ठ पत्रकार राजेश राजोेरे यांच्या भव्य सत्कार होणार आहे.उद्या शुक्रवार 6 जानेवारी रोजी दुपारी 3.15 वाजता पत्रकार भवनाच्या आवारात पत्रकार दिन सोहळयाचे आयोजन केल्या गेले असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रतापराव जाधव, जि.प.अध्यक्षा सौ.अलकाताई खंडारे, ना.रविकांत तुपकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालींधर बुधवत, उपजिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, सहा.माहिती अधिकारी निलेश तायडे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतिष गुप्त तथा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वंभर वाघमारे, समाधान सावळे, अनिल म्हस्के, व दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकार सोमनाथ सावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी काही मान्यवर पत्रकारांचाही सत्कार होणार असून, संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार बांधव तथा पत्रकारीतेवर प्रेम करणार्या नागरीकांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ व पत्रकार भवन समिती पदाधिकार्यांनी केले.