शेतकर्यांनो अनमोल जीवन संपवु नका ः जिल्हाधिकारी
यावेळी व्यासपिठावर उपविभागीय अधिकारी अप्पर तहसिलदार काकडे संस्थानचे अध्यक्ष शाम उमाळकर दुष्काळ निवारण संमीतीचे अध्यक्ष सिताराम महाराज ठोकळ तहसिलदार पागोरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना झाडे म्हणाले. भु सेवाधारी प्रकल्पाच्या माध्यमातुन आपणाला शेतकर्यांनी प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबुन न राहता जिवनाचा सकारात्मक पध्दतीने विचार करावा. आपल्या मुलाबाळांला सोडुन पळुन जाने जिवन संपवणे चांगले नाही. यावेळी कु.साक्षी गायकवाड ह्या विद्यार्थिनीने प्रकाश टाकला तर लेक वाचवा लेक शिकवा यावरती उत्कृष्ठ नाटीका सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन तहसिलदार काकडे यांनी भु सेवाधारी अभियान हे फक्त शासकीय योजनापुर्ते नसुन प्रत्येक गावातील तलाठी सरपंच विविध अधिकारी पदाधिकरी यांचे हे अभियान आहे. यातुन शेतकर्यांच्या जीवनात नख्खीच आशेचा किरण निर्माण होईल असे विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन सुनिल यांनी तरी आभार प्रदर्शन नायब तहसिलदार पागोरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास जवळपास 600 शेतकर्यांची उपस्थिती होती.