तिळगुळासारखी एकी कायम ठेवा : श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : सातारा जावली मतदारसंघात कोणताही भेदभाव न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चौफेर विकास साधला आहे. शिवेंद्रसिंहराजे हे सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून वावरणारे राजे आहेत, हे जावलीकरांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच जावलीतील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीतही आपल्यातली तिळगुळासारखी एकी कायम ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजेंना जावलीच्या विकासासाठी ताकद द्या, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
पावशेवाडी (ता. जावली) येथे मकरसंक्रांत आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिलांना मार्गदर्शन करताना सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या निर्मला दुधाणे, जावली राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा गिता लोखंडे, कुसूंबी गटाच्या इच्छुक उमेदवार अर्चणा रांजणे, बामणोलीच्या सरपंच लिलाबाई पवार, तेटलीच्या सरपंच लिलाबाई भोसले, केळघर तर्फ सोळशीच्या सरपंच विद्या साळुंखे यांच्यासह बामणोली परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे खूली करुन दिली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. शिक्षणाच्या जोरावर असंख्य महिला मोठ-मोठ्या हुद्यांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी जावलीतील जनता नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. गेल्या दोन अडीच वर्षात भाजप सरकार हे केवळ थापा मारणारे सरकार आहे हे सिध्द झाले आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी या सरकारने काहीही केलेले नाही. उलट नोटाबंदी सारखा निर्णय घेवून ग्रामीण भागातील जनता आणि प्रामुख्याने महिला वर्गाची कोंडी करुन ठेवली आहे. महिला आणि ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणून त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सबलीकरणासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. जावलीतील विकासगंगा अविरत ठेवण्यासाठी, जावलीच्या विकासासाठी जावलीतील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपुलकीचे आणि विकासाचे नाते घट्ट करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. जावली बाजार समितीचे सदस्य राम पवार यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.